दिनांक ३१ मार्च २००६ रोजी आई-दादांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. घरासमोरच सुवर्णमहोत्सवाचा मंडप उभा राहिला होता. सारे व-हाडी सकाळपासूनच यायला सुरुवात झाली. आई-दादांचे सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ नातेवाईक / हितचिंतक / मित्रमंडळी, झाडून सारे, या सुवर्णमहोत्सव सोहोळ्याला उपस्थित होते.
सकाळीच सत्यनारायणाचे आशीर्वाद घेऊन उभयता, व-हाड्यांचे स्वागत करायला तप्तर होते. संध्याकाळी दोघांचेही पुन्हा लग्न लावण्यात आले. सर्व व-हाड्यांनी जल्लोषात हा सुवर्णमहोत्सव साजरा करताना दांपत्याला शुभेच्छा दिल्या. सुहासिनींनी ५० दिव्यांची आरती ओवाळून उभयतांचे औक्षण केले. ज्येष्ठांनी दोघांना शुभाशिर्वाद दिले.
यावेळी भेळपुरी, शेवपुरी, दहीपुरी आणि पाणीपुरीची पंगत बसली होती.
Leave a Reply