तब्बल सात दिवस झाले त्या गोष्टीला … बारा फेब्रुवारीचा तो दिवस … अजूनही तस्साच्या तस्सा आठवतोय … दुपारी १२.३० ला बायकोचा फोन आला. म्हणाली, संध्याकाळी अनिलने बोलवलंय … म्हटलं कशाला? तर म्हणाली माहीत नाही. … रात्री आठला “प्रयोग” ची मिटिंग होती. काय करावं समजेना … बायकोही बोलताना थोडी टेन्शनमध्येच बोलत होती. मीही विचारात पडलो. … अनिलने का बोलवलं असेल? … असं कधी अचानक तो बोलवत नाही. … आणि मीही तसा त्याच्याकडे फारच कमी वेळा गेलो होतो. … काय करावं? …. शेवटी अनिलकडे जायचं ठरवलं.
संध्याकाळी सात वाजता असल्फा मेट्रो स्टेशनवर बायकोला भेटलो. मेट्रो स्टेशनवरून लिफ्टने खाली आलो की अनिलचं घर लागतं. … आणि बायकोनी नेहमीचाच घोळ घातला. “अहो अनिलचं घर समोरच्या बाजूला आहे की याच बाजूला?” तिने प्रश्न केला. … मी अनिलचा विचार करत होतो. तिच्यावर वैतागलोच. … “काय नेहमी नेहमी तोच तोच घोळ तुझा? याच बाजूला आहे.” पण तिचा माझ्यावर विश्वास नव्हता. तिने अनिलला फोन केला आणि दोन मिनिटात अनिल समोर हजर. जवळच त्याचं घर होतं. … त्याच्या मागून टेन्शनमध्ये चालु लागलो. घरासमोर आलो … दरवाजा उघडाच होता … अक्षताने हसत हसत स्वागत केलं … माझं टेन्शन पटकन नाहीसं झालं. अक्षता हसतेय म्हणजे every thing is OK. … दरवाजातून आत डोकावलो. घर मस्त पैकी डेकोरेट केलेलं. लाल, गुलाबी, पांढरे फुगे सगळीकडे लटकत होते. सोफ्यावर अलगद बसलो आणि …. सारा उलगडा झाला …
समोरच थर्माकोलनी बनवलेल्या गुलाबी रंगाच्या हार्टवर लिहिलं होतं …. Anil – Akshata – 25th Anniversary … समोरच्या गुलाबी हार्टनी आमचे हार्टबिट्स नॉर्मलला आणले. …. आम्ही दोघांनी त्या दोघांचं अभिनंदन केलं. …. अनिलनं डिक्लेअर केलं … आपल्याला हॉटेलमध्ये पार्टीला जायचंय …. सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळी जमेपर्यंत आठ वाजले. रिक्षाने हॉटेल महाराजाला पोचलो. अनिलनी टेबलं बुक केली होती. समोरच्या टीव्हीवर कोणती तरी क्रिकेट मॅच चालली होती. … आणि अक्षतानी माझी विकेट घेतली …. “भाऊजी, अॅनिव्हरसरीचं गिफ्ट म्हणून मला कविता पाहिजे”. … मॅच टीव्हीवर चालू होती आणि इथे माझी विकेट गेली होती. ऑर्डर दिल्याप्रमाणे एक एक dish टेबलावर विराजमान होत गेली … काट्याचमच्याच्या आवाजाचं पार्श्वसंगीत सुरु झालं … अक्षताची wish पुरी करण्यासाठी माझ्या डोक्यात कवितेची रेसिपी तयार होऊ लागली. …. काट्याचमच्यांच्या पार्श्वसंगीतावर शब्द नाचू लागले … टेबलावरची एक एक dish रिकामी होत गेली आणि … हळू हळू कविताही अलगद कागदावर उतरली …
अक्षता पडल्या “त्या” दिवशी
अनिल आणि अक्षतावर
पटकन पडली विकेट अनिलची
कारण अक्षता होती अंपायर
नंतर झाली युती दोघांची
अनिलनी मारल्या रन “पंचवीस”
फोर सिक्सरची केली धमाल
आयुष्याची मॅच मिळाली बक्षिस
अजून हव्यात तीन पंचवीस
मगच होईल एक सेंचुरी
ट्वेंटी ट्वेंटी आहेच नंतर
आनंदीआनंद येईल घरी
गद्धे पंचविशीच्या हार्दिक शूभेच्छा …
– प्रदीप देवरुखकर
Leave a Reply