निमंत्रण – १
गणपती बाप्पाचा मेल आलाय, [email protected] वरुन. सध्या त्याचं वास्तव्य त्याच्या बाबांकडेच हिमालयात आहे. तुमची सर्वांची आठवण काढलीय मेलमधे. म्हणाला सर्वांना निरोप दे, मी बोलावलंय म्हणुन सांग. सध्या बाप्पा खूप बिझी आहे. सर्व भक्तांना अपाॅईंटमेंट द्यायची म्हणजे बिझी रहाणारच ना.
पण आपल्याला अपाॅईंटमेंट मिळालीय, ३० आॅगस्टला संध्याकाळची. त्यादिवशी गौराई आणि सत्यनारायण महाराजांनाही मी निमंत्रित केलंय. तुम्हालाही निमंत्रण आहेच.
बाप्पाचं दर्शन आणि सत्यनारायणाचा महाप्रसाद दोन्हींचा लाभ मिळणार आहे तुम्हाला. तेव्हा २५ तारखेलाच नक्की या. कारण नंतर लगेचच बाप्पा दुसर्या भक्तांकडे जाणार आहे.
मी वाट पहातोय.
निमंत्रण – २
या वर्षी बाप्पाने मस्त आयडिया केलीय.
दरवर्षी त्याच्या दर्शनासाठी लांबलचक लाईन लागते, म्हणून “तुला पहातो रे …” असं म्हणत भक्तांना दर्शन देण्यासाठी तो स्वत:च टी.व्ही. वर अवतरला. सर्व भक्तांनी भरभरून दर्शन घेतलं. मीही होतोच ना त्या भक्तांमध्ये. पण बाप्पा हळूच माझ्या कानात बोलला. तुझ्या घरचे मोदक मस्त असतात. मोदक खायला यायचंय मला तुझ्या घरी. रविवारीच येतो, १६ सप्टेंबरला. सोबत गौराई आणि सत्यनारायण देखील येणार आहेत. तुझ्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांनाही आवतन दे, मोदकाच्या पार्टीचं. मीही भेटेन त्यांना.
तर मंडळी, मोदक आणि बरंच काही आहे पार्टीला. तेव्हा तुम्ही याच १६ सप्टेंबरला. अर्थात माझ्या घरी.
मी वाट पहातोय, आणि बाप्पाही.
प्रदीप देवरुखकर
अ/२, मधुर सहकारी गृहनिर्माण संस्था, चिंचवली बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई – ४०००६४.
भ्रमणध्वनी : ९९२०७५९६५९
निमंत्रण – ३
नमस्कार
आमच्याकडे आल्यापासुन बाप्पा सारखी आठवण काढतोय तुमची. मागील वर्षी तुम्ही भेटला होतात ना बाप्पाला आमच्या घरी. मग यावर्षीही तुम्हाला यावच लागेल. पण थोडं थांबा. सार्या भक्तांना दर्शन देण्यात तो बिझी आहे. म्हणून आमच्याकडील भक्तांना भेटण्यासाठी त्याने ९ सप्टेंबरचा दिवस मोकळा ठेवलाय. ९ सप्टेंबर का हे माहीती आहे का? कारण त्या दिवशी गौराई आणि सत्यनारायण महाराज सुद्धा आमच्याकडे येणार आहेत. म्हणजे बाप्पा बरोबर गौराई आणि सत्यनारायण महाराजांचाही आशिर्वाद आपल्या मिळणार आहे. तेव्हा नक्की या ९ सप्टेंबरला . आमच्या घरी म्हणजेच A/2, मधुर सोसायटी, चिंचवली बंदर रोड मालाड (प) येथे. आम्ही वाट पहातोय.
प्रदीप देवरुखकर आणि कुटुंबिय.
निमंत्रण – ४ (कोरोनासंगे) (२०२०)
कालचीच गोष्ट …
सकाळचे सहा वाजले होते. दुधकेंद्राजवळ आलो आणि क्षणभर थबकलो. तिथे कोरोना उभा होता. मला कडकडून भेटायला आतुर झाला होता. मी बिनधास्त पुढे गेलो. आता दुधकेंद्रावर मी त्याच्या समोर उभा होतो. पण माझ्याकडील मुखपट्टीसह हस्तावरणादी आयुधे पाहून तो पळून गेला. दुधकेंद्रावरील संकटमोचक गणेशाच्या मोहक तसबिरीसमोर मी नम्रपणे नतमस्तक झालो. त्या गणेशानेच मला कोरोनापासून वाचवले होते. बाप्पाने हसतच सांगितले, असाच सावध रहा आणि सर्व मित्रमंडळी व नातेवाईकांनाही असेच सावध राहून या गणेशोत्सवात माझी दूरस्थ भेट घ्यायला सांग. दूरस्थ भेट असली तरी मी रागावणार नाही. तुझ्या घरी परंपरेप्रमाणे मी येणारच आहे.
भक्तांनो, दरवर्षी मी आपल्याला गणेशदर्शनाचे आग्रहाचे निमंत्रण देतो. बाप्पाही तुम्हाला भेटायला उत्सुक असतो. त्यानिमित्ताने भेटीचा सुंदर सोहोळा संपन्न होतो. यावर्षी बाप्पानेच आज्ञा केली आहे. बाप्पाची आज्ञा शिरसावंद्य. त्यानेही दूरस्थ आशिर्वाद सर्वांना दिला आहे. कोरोनाचे कायमचे विसर्जन करा. आपल्या घरातूनच बाप्पाचे दूरस्थ दर्शन घ्या.
पुढील वर्षीच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या प्रत्यक्ष भेटीचा सुंदर सोहोळा पुन्हा संपन्न होणारच आहे.
निरोगी रहा, सुरक्षित रहा.
Leave a Reply