मला पहाशील का?

वैभव कमल जोतिराम सूर्यवंशी.  आमच्या दूध केंद्राचा मालक. 

वडील जोतिराम यांच्या बरोबर दूध व्यवसायाची जबाबदारी सांभाळणारा युवक.  वय असेल २० ते २५ वर्षे.  कॉलेज विद्यार्थी आहे म्हणून वय २० ते २५ वर्षे असेल, असे अनुमान बांधले.  सकाळी सहाच्या ठोक्याला दूध केंद्रांवर हजर.  हसत खेळत गिऱ्हाईकांना दूध देणारा.  साईभक्त.  व्यवसायात पूर्णपणे रमलेला. वडिलांनी लग्न लावून दिल्यावर संसारातही रमला. फेसबुकवर उभयतांचे फोटोही झळकले. 

एक दिवस अचानक फेसबुकच्या मेसेंजरवर त्याची कविता वाचली. प्रेमरसात पूर्णत: बुडालेली. आपल्या प्रियेला आर्त होऊन हाक मारणारी ही कविता … 

कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी,
पाहशील का?
पाहशील का?

कविता मला खूप भावली.  आपोआपच मी ही त्यापुढील ओळी लिहिल्या. त्याच्या प्रियेच्या वतीने … 

मी इथे उभी तुझ्याचसाठी
आतुरलेली, आसुसलेली
सरतच नाही वेळ ही नाठी
लवकरी येशील ना?

सांज सरली, येईल रात्र
गात्रं थरारली, आठवणीने
तुझ्या ओढीने आतुरला जीव
जवळी आता घेशील ना?

धुंद रातीला कुरवाळे पहाट
नवरंग फुलतील या तनुवरी
झाले अधीर मिलनाला
तूच आता सावरशील ना?

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *