वासुदेव गुणाजी गावडे. माझा सहकारी. चतुर्थ श्रेणीतील असून सुध्दा नेहमीच आमच्या बरोबरीने काम करणारा. नोकरीतील माझ्या पहिल्या दिवसापासुनचा मार्गदर्शक. सगळेच त्याला वासू म्हणायचे. कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांचे अनेक नाके असतात. वासुगिरी करण्याचं हे ठिकाण असतं. म्हणून त्याला वासूनाका म्हणतात.
पण मला कॉलेजच्या आत हा ‘वासू’ भेटला. त्याच्यामुळे कॉलेजच्या कामाचे अनेक खाचखळगे समजले. त्याच्या निवृत्तीदिनी निरोप समारंभाला त्याला भेट दिलेला ‘वासूनाका’
