रवींद्र दाजी सावंत – ६१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pradip Deorukhkar, [04.07.20 20:46]
हॅलो R D S,

R D S म्हणजे RDX सारखं वाटतं नाही?

RDX च्या फिचर्स आणि R D S च्या फिचर्स यात काहीच फरक नाही.

RDX सारख्याच R D S च्या फिचर्स स्फोटक आहेत.

रविंद्र दाजी सावंत -म्हणजे R D S याच्या सुरस, चमत्कारीक आणि खुसखुशीत कथा सर्वांनाच माहितीयेत.

आपल्या शाळेतल्या कथा रे.

अरे शाळेत तू सर्वांचा लिडर होतासt. लिडर म्हणजे माॅनिटर नव्हे. माॅनिटर होता अनंत भिकाजी कदम. आपण त्याला अत्यंत भिकारी कदम म्हणायचो. तूच त्याचं हे बारसं केलं होतस. तशी तू अनेक जणांची बारशी केली होतीस. चपट, ठणठणवाला, भट, फफ्या, वाघोबा, शेंबड्या आणि सोनार म्हणजे मी अशी किती तरी. आपले शिक्षक शिक्षिकाही त्यातून सुटल्या नाहीत. त्यांच्यात मेंढी, रीटा, चंबू, ढापण्या, सुभाषबाबु, फाटक्या असे नामकरणविधी तूच केलेस. कारण तू आमचा लिडर होतास.

भंकस तर तू नेहमीच करायचास. आयला, भे…. म्हणजे भेकड, मा……. म्हणजे माननीय या सारख्या शब्दांशिवाय तू काहीच बोलायचा नाहीस. जाम धमाल केली रे आपण.

स्पोर्ट्स मधे सुद्धा तु साॅलीड होतास. खो खो आणि क्रिकेट तुझे आवडीचे खेळ. पिकनिकला तर तू नुसता सुटायचास. जोक्स आणि भंकसचं तुफान यायचं. वासुकडे गेलो होतो आपण अलिबागला. अकरावीची परिक्षा नुकतीच आटोपली होती. आख्खी रात्र जागवली होती आपण. प्रत्येक दिवाळीला वासुची आठवण येते. गेला बिचारा.

अकरावी नंतर आपण सारेच अकराव्या दिशेला गेलो. दिशा दहा असतात. पण आपल्यासाठी अकरावी दिशासुद्धा होती. जी कोणालाच माहीत नव्हती. कोण कोणत्या दिशेला करीयरसाठी गेलं हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे आपल्यातील संपर्क पूर्णपणे तुटला होता. करियर, संसार, मुलबाळं. वर्ष कशी सरली समजलंच नाही.

आणि पुन्हा एकदा आपण एकत्र आलो. कधीतरी भेटतो आपण एक दोन तासांसाठी. भेटल्यानंतर तीच आ ….. भे ….. मा….. ची बाराखडी बोलतो आणि परत आपापल्या घराकडे वळतो. शाळेसारखं रोज भेटता येत नाही आता.

त्यादिवशी उल्हासचा फोन आला. म्हणाला, रवीची एकसष्ठी आहे.
तुझा व्हिडीओ पाहीजे. मी म्हटलं, अरे आम्ही एकमेकांबद्दल शिव्यांशिवाय बोलुच शकणार नाही. तरीसुद्धा एकही शिवी न घालता तुला शुभेच्छा देतोय.

R D म्हणजे रविंद्र दाजी
शाळेतच आपल्या होता शिवाजी
साठ लढाया मारल्यास तू …..
जिंकशीलस तू लढाई शतकाची

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *