राज्य नाट्य स्पर्धा – २०१८ … प्रयोग मालाड ने डॉ. अनिल बांदिवडेकर लिखित आणि दिग्दर्शित “कथेकरी” हे दोन अंकी नाटक सादर केले. प्राथमिक फेरीतील प्रयोग सादर झाल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व कलाकारांचे ‘कौतुक’ करणाऱ्या माझ्या शुभेच्छा
प्रत्येकजण काल
बनला “कथेकरी”
उत्तुंग स्वप्न
प्रत्येकाच्या ऊरी
कालची नशा
प्रत्येकाच्या श्वासात
रात्र झोपेविना
मन गुंतवू कशात?
काल घेतलीच तुम्ही
भरारी उंच उंच
ती होती किती इंच?
लवकरच कळेल.
किती उंच? किती इंच?
परिमाणे सारी ……..
जमलाय आपला प्रपंच
वाढलीय जबाबदारी
“इंचा” चा हिशोब
झुगारुन द्या
“उंची” चे “लक्ष”
लक्षात असु द्या
उंच उंच झेप
हीच हवी प्रतिज्ञा
शर्त करा सर्वांनी
हीच “गुरुं” ची आज्ञा
कालचे सत्य एकच
प्रत्येकाचा सहयोग
प्रत्येकाचे ध्येय एकच
अंतिम “प्रयोग”
Leave a Reply