लग्नपत्रिका नमुने …

लग्नपत्रिका – १

प्रेषितचा आमच्या
ठरलाय विवाह मुहूर्त
कार्य सिद्धीस नेण्यास
श्री गणराय समर्थ

पाठीशी उभी
साक्षात भैरी भवानी
सकल जनांची कैवारी
भक्तांची जननी

हाती घेउनी वरमाला
सिद्ध झालीय विवाहाला
गायत्री नामे ही बाला
वरलंय तिने प्रेषिताला

मोहन आणि माला
यांची लाडकी लेक
सुस्वरूप, सुस्वभावी
विचारांनी नेक

देवरुखकर आणि टंकसाळी
झाले व्याही व्याही
अवघा आनंदीआनंद
जुळले सर्व काही

तारीख झालीय नक्की
१६ नोव्हेंबर ची
वेळही ठरलीय छान
सायंकाळी ६ ते ९ ची

सी.टी. चटवानी बँक्वेट हॉल
अंधेरीच्या पूर्वेला
सीटी पॉईंट, तेली गल्ली
राजर्षी शाहू महाराज रोडला

हेच आहे विवाहस्थळ
आशिर्वाद देऊ तयाना
सहभोजनाचा आनंद
सारेच घेऊया ना

चावरे, जाधव, देवरुखकर,
व-हाडी आमुचे सारे
शहा, जव्हेरी, लवेकर
आमचे सगे सोयरे

तेव्हा नक्की यायचंय
शुभ तयांचे चिंतीण्या
नवविवाहित दांपत्याला
शुभाशिर्वाद देण्या

लग्नपत्रिका – २

श्री. रामकृष्ण गाडगीळ – माझे नाट्यक्षेत्रातील गुरु – त्यांच्या नातवाची ही लग्नपत्रिका

………………… लग्न …………………

प्रत्येकाच्या आयुष्यातील, पवित्र मंगल क्षण
गोड गुलाबी स्वप्नातील, सुखाचे नंदनवन

अपवाद नाही त्याला, आदित्यही आपला
असीम प्रेमाची, “सीम” मिळालीय त्याला

हाती गुंफुनी हात, वदले उभयता
आम्ही फक्त निमित्त, तोच कर्ता करविता

“त्या”च्या करणीला, आम्हीही म्हटले “तथास्तू”
सुखी रहा जीवनात, “शुभमंगलम् अस्तु”

विनय आणि मंजू, मागे नाही हटले
कन्येच्या सुखास्तव, त्यांनीही “तथास्तू” म्हटले

गाडगीळ-तिवारी, जोडी जमली छान
इंदूर शहरी होणार, “शुभमंगल सावधान”

१८ मार्चला, दुपारी १ च्या प्रहरी
नव्या गुलाबी संसाराचे, होणार “श्रीहरी”

इंदूर देशीची ओलांडूनी सीमा, “सीम” येणार मुंबापुरी
आदित्यसह गोड गुलाबी, स्वप्न घेऊन येणार उरी

आशिर्वाद आपला मोलाचा, मार्गदर्शनही हवेच हवे
पवित्र क्षण हा मांगल्याचा, साजरा होणार आपल्या सवे

हेच असे खास निमंत्रण, नवदाम्पत्याच्या मुखदर्शनाचे
२१ मार्चच्या शुभदिनी, होणा-या स्वागत समारंभाचे

आम्ही वाट पाहतोय
रामकृष्ण गोपाळ गाडगीळ | गीता रामकृष्ण गाडगीळ
उर्मिला मनोहर गोंदकर

नक्की या हं
राजेश व शुभदा
मंगेश व श्रद्धा, आशिष व शिल्पा
चेतना व समीर, योगेश व लक्ष्मी
मिताली, सानिका, ऋषी, वेदिका
सेजल, स्नेहा

लग्नपत्रिका – ३

अपूर्वा आणि आल्हाद – माझी भाची – तिची लग्नपत्रिका

सद्गुरुंची गोडगोजिरी
अवखळ अल्लड लाजलाजरी
अंगणातली ही नन्ही परी
रमणार आता संसारी

पाठीशी उभी तुळजाभवानी
रक्षणकर्ती जीवनतारिणी
तिच्याच कृपेने अपूर्वाराणी
होणार नवरी सौभाग्यकांक्षिणी

कृष्णाशिष अन् दत्तकृपेने
सजली अमुची बलस्थाने
दिर्बादेवीच्या निरंतन कृपेने
कार्यसिद्धी निर्विघ्ने

अटक – कावले व्याही व्याही
जुळोनी आले सर्व काही
२४ दिनांके नोव्हेंबर माही
लग्नघटीका अवतरली ही

११.५० च्या सुवर्णक्षणी
गळी लेवुनी सौभाग्यलेणी
अटकांची धाकली राणी
होणार आल्हादची पट्टराणी

एक ते अडीच च्या मध्यान्ही
स्वागत अन् स्नेहभोजन
कलर्सस्केप माँलमध्ये
होणार ग्रँड सेलिब्रेशन

सज्ज झालेत सगेसोयरे
व-हाडी अन् वाजंत्रीही
लग्नमंडपी मिळोनी सारे
करूया सोहळा राजेशाही

तेव्हा नक्की यायचंय
शुभ तयांचे चिंतीण्या
नवविवाहित दांपत्याला
शुभाशिर्वाद देण्या

In