झगडत झगडत त्याने
सर केला गड
रंगभूमीतून घेऊन ऊर्जा
जपली आपली आवड
“आवाज” दिला सहकाऱ्यांना
चला करूया सुरुवात
एकत्र आले सारे
केली नवलाईची रुजवात
दिग्दर्शनाचा ध्यास तयाचा
बसू देईना स्वस्थ मना
उघडुनी तिसरा डोळा
चकित केले सर्वांना
भिंगातून पाहुनी त्याने
नजर फेकली दूरवर
अंधारातूनी आला “आवाज”
शर्थ कर शर्थ कर
पेटला गडी झपाटला गडी
“संकेत” सर्वांना दिले त्याने
म्हणाला, आता पहाच तुम्ही
पेश होईन दिमाखाने
यु ट्यूब आहे साथीला
अनुभव आहे गाठीला
ईर्षा पोचलीय पराकोटीला
छोटीला घेऊन येतोच भेटीला
छोटी … (Short film)
Leave a Reply