सुरेश लाडकडून मिळालेली होळीची अकल्पित भेट …

२९ मार्च २०२१ – धूलिवंदनाचा दिवस. अलिबागच्या घरी बाल्कनीत बसून संध्याकाळची कॉफी घेत होतो. समोरचा हिरवागार निसर्ग सुखावत होता. एवढ्यात स्मिताच्या फोनवर संदेश आल्याचे ओळखीचे संगीत वाजले. लाडने whatsapp वर काहीतरी पाठविले होते. माझे whatsapp मी बंद केल्यामुळे माझ्या काही ओळखीच्या मित्रांचेच संदेश स्मिताच्या whatsapp  वर येतात.  कारण फक्त त्यांनाच whatsapp संदेश पाठविण्यासाठी स्मिताचा फोन नंबर दिला आहे.  या “काही ओळखीच्या” मध्ये सुरेश लाड चा समावेश आहे. 

सुरेश लाड – लाला लजपत राय कॉलेज मधील माझा सहकारी. मी त्याला ‘अहो लाड’ अशीच हाक मारायचो. मला तो नोकरीत खूपच सिनिअर.  वयानेही सिनिअर.  म्हणजे तो ऑगस्ट २००७ ला सेवानिवृत्त झाला तर मी फेब्रुवारी २०१५ ला.  वयात आठ वर्षांचे अंतर असूनसुद्धा माझ्याशी मित्रत्वाचे नाते होते. तसा तो सर्वांचाच ‘लाड’ला होता.  तर या अशा ‘लाड’ल्या लाडच्या निरोप समारंभाला सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी लिहिलेल्या निरोपाच्या भाषणाची ‘आठवण’ लाडने आठवणीने आज मला पाठवली.  खरोखरच धूलिवंदनाची सुंदर भेट आहे ही.  धूलिवंदनाची भेट … 

In