२६ फेब्रुवारी – हेमंत हेडाऊ चा जन्मदिन- हेमंत हेडाऊ चा जन्मदिन. हेमंत फोन करून भेटायला आला. अनोळखी. अभिनेता व्हायचे स्वप्न उरात घेऊन आल्यासारखा वाटला. प्रयोग मालाड मध्ये रमला, जमला. टेरेस थियेटरवर अनेक एकांकिका केल्या. कथेकरी, अनजान शहर सारखी नाटके राज्य नाट्य स्पर्धेत सादरही केली. पण शुल्लक कारणावरून नाराज होऊन प्रयोग मालाड साठी ‘अनजान’ झाला. २६ फेब्रुवारी त्याचा जन्मदिन. सन २०१८ ला दिलेल्या या माझ्या शुभेच्छा…
तो आला फोन करुन
बोलला भरभरुन
कळलंच नाही कोणाला
वर्ष कसं गेलं सरुन
गाडगीळ गुरुजींच्या शाळेत
शिकला अ आ इ ई उ ऊ
अभिनय केला दमदार
नाम तयाचे हेडाऊ
जन्मदिनी तयाच्या
सर्वांनीच केले “विश”
जनाधार पाहून त्याचा
पळून गेले जाॅन्डीस
पळून गेले जाॅन्डीस
जुळले रेशिमबंध
जन्मदिनी तयाच्या
शूभेच्छांचा गुलकंद
………….. हेमंतला, आसमंत व्यापून टाकणा-या खूप खूप शूभेच्छा.
Leave a Reply