१६ नोव्हेंबर २०१७ –
पहीले वर्ष सहजीवनाचे
भावभावनांच्या मिलनाचे
गोडगुलाबी स्वप्नांचे
जबाबदारीच्या जाणिवेचे
………. सहजीवनाच्या प्रथमवर्षपूर्ती निमित्त अभिनंदन
भविष्यातील सुखी आणि समृद्ध सहजीवनासाठी
अनेकानेक आशिर्वाद
……….. आजी आणि आई-बाबांकडून
१६ नोव्हेंबर २०१८ –
प्रिय प्रेषित आणि गायत्री,
वैवाहिक आयुष्याचे दुसरे वळण पार केल्याबद्दल अभिनंदन.
कसा होता दोन वर्षांचा प्रवास?
एकमेकांच्या सहवासात, गोड गुलाबी स्वप्नात पहिले वर्ष कसं सरलं हे कळलंच नसेल ना? एकमेकाची ओळख करून घेण्यातच हे पहिले वर्ष पटकन निघून गेलं असेल. आयुष्याच्या वाटेवरील पहिल्या वर्षाच्या या सहप्रवासात अनेक नव्या-नव्या संसारिक गोष्टींची तोंडओळखही तुम्हाला झाली असेल. तोंडओळख झालेल्या या संसारिक गोष्टी तुमच्या आयुष्यात सतत समोर येणार आहेत. या मोहमयी दुनियेत संसाररूपी जहाजातून प्रवास करताना समतोल कसा राखावा याचे शिक्षण याच संसारिक गोष्टी तुम्हाला देणार आहेत.
पहिल्या वर्षातील अनुभव दुस-या वर्षात तुम्हाला नक्की उपयोगी पडला असेल. पहिल्या वर्षात नवख्या वाटणा-या सर्व गोष्टीं दुस-या वर्षात तुमच्या मित्र / मैत्रिणी बनल्या असतील. या प्रवासात काही शत्रूही भेटले असतील. पण तरी सुध्दा या सर्व मित्र / मैत्रिणींच्या साथीने तुम्ही वैवाहिक आयुष्याचा दुस-या वर्षाचा प्रवासही लीलया पार पाडलाय.
आता तुम्ही प्रगल्भ झाला आहात. आयुष्यातील पुढील प्रत्येक वर्षाच्या प्रवासात एकमेकाच्या साथीने अनेक धोकादायक वळणे सहजपणे ओलांडून पुढेच जात रहाल याची खात्री आहे.
वैवाहिक आयुष्यातील पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा…
… आजी आणि आई – बाबांकडून
Leave a Reply