१ जुलै २०२० – आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन … माझा प्रणाम

डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना सादर प्रणाम …

तुम्हीच आहात गाथा
तुम्हीच एक कथा
आला तो कोरोना
हीच सर्वांची व्यथा

आली कोरोनाची अवदसा
तो धरितो आमचा घसा
जीव होतो कसाबसा
तुम्हीच आमचा भरवसा

तुम्हीच आहात त्राते
तुम्हीच जीवनदाते
कोरोनाच्या वावटळीत
तुम्हीच आता विधाते

In