शिल्पा काकीला हॉस्पिटलमध्ये admit करावे लागले. बोयसरच्या BARC हॉस्पिटल ते अंधेरीचे सेवन हिल्स हॉस्पिटल ते गिरगावच्या H.N. Reliance हॉस्पिटल मधील आणि त्यानंतरची परवड… याची ही गोष्ट.
कालची (१९/०५/२०२०) सत्यघटना …
विरारची रुग्ण महिला (रुग्ण) – वय ७७ वर्षे. अर्धग्लानी अवस्थेत.
रुग्णाचा नवरा B.A.R.C. मधून निवृत्त.
त्यामुळे रुग्णाचे वैद्यकीय उपचार B.A.R.C. तर्फे.
रुग्ण तारापूरच्या B.A.R.C. हॉस्पिटलमध्ये दाखल.
B.A.R.C. डॉक्टरांचा सल्ला.
पुढील उपचारासाठी सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करा.
रुग्ण आता सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल.
रुग्णाची रक्तचाचणी.
कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट्स निगेटिव्ह.
पण इतर रिपोर्ट्स काहीसे असमाधानी.
दोन दिवसांच्या उपचारानंतर सेवन हिल्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सल्ला.
रुग्णाला पुढील उपचारासाठी H.N. Reliance हॉस्पिटलमध्ये (गिरगांव) स्थलांतरित करा.
पुन्हा B.A.R.C. तर्फे रुग्ण H.N. Reliance हॉस्पिटलमध्ये (गिरगांव) स्थलांतरित.
रुग्णाची एकुलतीएक मुलगी आणि तिचा नवरा (श्री व सौ) हेच जवळचे नातेवाईक.
रुग्णासह श्री व सौ विरारचे रहिवासी.
रुग्णाला H.N. Reliance हॉस्पिटलमध्ये (गिरगांव) स्थलांतरित करण्यात अख्खा दिवस खर्ची.
रात्रीचे ११ वाजले.
म्हणून श्री व सौ ठाकुरद्वारच्या महिला नातेवाईकाकडे (नातेवाईक) आश्रयाला जाणार.
पण …
इथेच श्री व सौ ची परवड सुरू.
श्री व सौ च्या एका रात्रीच्या वास्तव्याला ठाकुरद्वारच्या नातेवाईकाच्या सर्व शेजाऱ्यांचे strong objection.
सर्व शेजारी एकत्र आले.
श्री व सौ ला आसरा न देण्यासाठी शेजाऱ्यांचा नातेवाईकावर दबाव.
परिणामी श्री व सौ पूर्णपणे निराश.
वेळ रात्री ११ ची.
आजूबाजूची हॉटेल्स बंद. त्यामुळे तिथे आसरा मिळणे कठीण.
श्री व सौ टेन्शनमध्ये.
विरारला जायचे कसे?
आणि …
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची एपिसोड मध्ये एन्ट्री.
त्याने सुत्रे हाती घेतली.
टॅक्सीची व्यवस्था केली.
श्री व सौ दोघेही सुखरूप दुसऱ्या नातेवाईकाकडे जोगेश्वरीला.
इथे मात्र शेजारधर्म पाळला गेला.
रुग्ण H.N. Reliance हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय.
श्री व सौ ना कोरोनाचा संसर्ग नाही हे विशेष.
शेजाऱ्यांच्या असहकारामूळे ठाकुरद्वारचा नातेवाईक निराश.
नातेवाईकाचा गोराईला स्वतः:च्या मुलीकडे जायचा निर्णय.
आणि गोराईला दुसरा एपिसोड सुरू …
मुलीच्या सोसायटीत गोराईला बातमी पसरली.
मुलीची आई येतेय…
ठाकुरद्वारची पुनरावृत्ती.
सोसायटीतील सर्व शेजारी एकत्र.
आईला आसरा न देण्यासाठी मुलीवर दबाव.
मुलगी आणि आई दोघीही निराश.
आई अजून ठाकुरद्वारलाच.
अशी ही कोरोनाची कहाणी… असफल … अपूर्ण.
असफल … अपूर्ण कशासाठी?
कोरोना आणि लॉकडाऊनचा विळखा बसला आणि सर्व मीडियांवर कोरोनाचे कवित्व सुरू झाले. सामान्यांना सहज उपलब्ध असलेल्या सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. कोरोना कसा पसरला? कोरोना कुठे कुठे पोचला? कोरोनामुळे कोण कोण बाधित? कोरोनामुळे किती लोकांचे स्थलांतर? चोहीकडे संशयाचे वातावरण.
तिसरा लॉकडाऊन संपताना वेगळीच चर्चा सुरू झाली. आता कोरोनासह जगायला शिका. प्रत्येकाने कोरोनापासून स्वतःचा बचाव करायला शिकणे आवश्यक आहे. पण हे शक्य आहे का? समोर येणारा प्रत्येक माणूस कोरोनाबाधित आहे अशीच प्रत्येकाची नजर. माणूसधर्मच नाहीसा झालाय तिथे शेजारधर्माचे काय?
ठाकुरद्वारच्याच त्या बिल्डिंगमधील एका लेखकाने लिहिलेले नाटक माझ्या लहानपणी मी पाहिले होते. त्याचे नाव होते – “माणसा तू माणूस हो”. आज इतक्या वर्षांनी त्या नाटकाच्या सत्यतेची प्रचिती येतेय. माणूसपणच हरवलंय.
म्हणूनच वाटतंय. कोरोनाची ही कहाणी … असफल … अपूर्ण.
… प्रदीप देवरुखकर
२०/०५/२०२०1
Leave a Reply