प्रेषितचे शुभमंगल सावधान …

प्रेषितच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका काहीतरी वेगळीच बनवायची असं मनाशी ठरवलं होतं.  फक्त लग्न नक्की व्हायचं बाकी होतं. ओळखी-पाळखीत सर्वांना सांगून ठेवलं. वधू-वर सूचक मंडळात नोंदणी केली.  ऑनलाईन मराठी मॅट्रीमोनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं.  पण …

एकदाचं लग्न ठरलं.  निमंत्रण पत्रिका कशी बनवायची?  डोक्यात चक्रं फिरायला लागली आणि साकारली एक काव्यमय निमंत्रण पत्रिका…

प्रेषितचा आमच्या
ठरलाय विवाह मुहूर्त
कार्य सिद्धीस नेण्यास
श्री गणराय समर्थ

पाठीशी उभी
साक्षात भैरी भवानी
सकल जनांची कैवारी
भक्तांची जननी

हाती घेउनी वरमाला
सिद्ध झालीय विवाहाला
गायत्री नामे ही बाला
वरलंय तिने प्रेषिताला

मोहन आणि माला
यांची लाडकी लेक
सुस्वरूप, सुस्वभावी
विचारांनी नेक

देवरुखकर आणि टंकसाळी
झाले व्याही व्याही
अवघा आनंदीआनंद
जुळले सर्व काही

तारीख झालीय नक्की
१६ नोव्हेंबर ची
वेळही ठरलीय छान
सायंकाळी ६ ते ९ ची

सी.टी. चटवानी बँक्वेट हॉल
अंधेरीच्या पूर्वेला
सीटी पॉईंट, तेली गल्ली
राजर्षी शाहू महाराज रोडला

हेच आहे विवाहस्थळ
आशिर्वाद देऊ तयाना
सहभोजनाचा आनंद
सारेच घेऊया ना

चावरे, जाधव, देवरुखकर,
व-हाडी आमुचे सारे
शहा, जव्हेरी, लवेकर
आमचे सगे सोयरे

तेव्हा नक्की यायचंय
शुभ तयांचे चिंतीण्या
नवविवाहित दांपत्याला
शुभाशिर्वाद देण्या

– प्रदीप देवरुखकर

In