माणसाने जगावं की मरावं?
सर्वत्र कोरोनाचा फैलाव
जो तो म्हणतो घरात बसा
म्हणे आणुया बदलाव
घरात बसूनच सजवूया क्षण
साजरा करूया प्रत्येक सण
कुटुंबसुखाचं मिळेल आंदण
आयुष्य फुलेल दे दणादण
बसायचंय घरात २१ दिवस
सरकलेत आता ७ दिवस
कोण म्हणतो हाच वनवास?
हा तर आहे कुटुंब सहवास
करूया निर्धार १४ दिवसांचा
कोरोनाच्या निप्पाताचा
सोशल डीस्टन्सिंग पाळूया
कोरोनाला पळवूया
प्रदीप देवरूखकर
१ एप्रिल २०२०
हे एप्रिलफुल नव्हे.