पॅराडीसो बे, किहीम येथील वन बीचके फ्लॅट… प्रेषित आणि गायत्रीच्या स्वप्नातील सेकंड होम.
निवांत, हवेशीर, सभोवतालाच्या निसर्गाचे होणारे हिरवेगार दर्शन, मुंबईपासून जलमार्गे अथवा रस्तेमार्गे जवळ आणि मुख्य म्हणजे जीवनावश्यक वस्तू सहजच मिळणारा सोयीचा आणि नजीकचा बाजार.
वेबसाईटवर खुप शोधाशोध केल्यानंतर प्रेषितला आवडलेले हे सेकंड होम.
तर ७ फेब्रुवारी २०२० च्या शुभ मुहूर्तावर वास्तुशांती संपन्न झाली. पाहुणे-रावळे, नातेवाईक उपस्थित होते.
प्रेषित-गायत्रीने वास्तुची पूजा करून गृहप्रवेश केला. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मी ही त्यांना खालील शुभेच्छा दिल्या …
नवी इर्षा
नवी इच्छा
नवी स्वप्ने
नव्या घराची
गृहप्रवेश आज
चढलाय साज
झाली रोषणाई
या घरी
आजीचा आशीर्वाद
आईबाबांचे प्रोत्साहन
नातेवाईकांच्या शुभेच्छा
तुमच्या ठायी
प्रयत्नांती परमेश्वर
हेच जीवनसूत्र
जीवनाचा अर्थ
समजून घ्या
Leave a Reply