समर्थ दत्तात्रय जव्हेरी – सध्या वास्तव्य भारताबाहेर. त्यामुळे प्रत्यक्ष भेट नाहीच. सारे काही whatsapp वरच. पण ०८ सप्टेंबर २०१९ ला समर्थ साहेबांना whatsapp वर पोस्ट टाकायला वेळच मिळाला नाही. मग पुजानेच गुड न्यूज दिली. ज्युनिअर समर्थांनी या जगात एन्ट्री केली होती. त्या प्रसंगाचे हे वर्णन …
रिद्धीने केला मेसेज
वेदिका झाली ताई
बाळ-बाळंतीण सुखरूप
आनंद ऊतू जाई
कार्य “सिद्धी” झाली
अवघाची आनंद
“समर्था”चे ठायी
आला समरानंद
वीणा आजी आता बिझी
कसले कसले प्लॅन तिचे
वेदिका नंतर आला वेद
किती लाड करू तयाचे
‘अगस्ती दर्शन’ दिनी
शुभेच्छांचा पाऊस
सारेच जण उत्साहले
Happy Mood full house
… वेदाचार्य समरानंद महाराजांचे स्वागत असो.
Leave a Reply