आशा माझी मेव्हणी. MSEB मधील तिच्या निरोपसमारंभात मी लिहिलेली आणि स्मिताने सादर केलेली कविता …
ती …
ती असली काय …
नी नसली काय …
काय फरक पडतो?
पण ‘आशा’ नेहमीच असते ..
प्रत्येकाच्या मनात…
ती दिसली काय …
नी रुसली काय ..
काय फरक पडतो?
पण ‘आशा’ नेहमीच असते ..
प्रत्येकाच्या घरात …
कर्जत MSEB काय …
नी कल्याण MSEB काय …
काय फरक पडतो?
‘आशा’ नेहमीच डोकावलीय
प्रत्येक डिपार्टमेंटला
ठाणे मुलुंड काय …
नी क्लार्क कॅशियर काय ..
काय फरक पडतो?
‘आशा’ ने नेहमीच हिशोब केलाय ..
पै न पै चा ..
पाचवे पान काय …
नी पन्नासावे पान काय …
काय फरक पडतो?
पण ‘आशा’ नेहमीच दिसलीय
प्रत्येक फाईल मध्ये …
स्त्री कर्मचारी काय …
नी पुरुष कर्मचारी काय …
काय फरक पडतो?
पण ‘आशा’ ची मदत आहेच …
सदासर्वदा …
युनियन इथली काय …
नी युनियन तिथली काय …
काय फरक पडतो?
पण ‘आशा’ नेहमीच लढलीय ..
प्रत्येक अन्यायाशी …
३१ ऑगस्ट …
आजपर्यंतचा काय …
नी आजचा काय …
काय फरक पडतो?
पण ‘आशा’ नाहीच उद्यापासून
या MSEB मध्ये …
या MSEB मध्ये …
या MSEB मध्ये …
Leave a Reply