बऱ्याच मोठ्या ब्रेक नंतर … “प्रयोग मालाड”चे पुन:ष्च हरि ओम …

“प्रयोग मालाड”ची नाट्यशाखा _________ सालच्या राज्य नाट्य स्पर्धेनंतर निष्क्रिय झाली. एकांकिका स्पर्धा, टेरेस थियेटर, स्पर्धा आयोजन तसेच इतरही शाखांचे कार्यक्रम जवळजवळ ठप्प झाल्यासारखे होते. कार्यकर्ते आणि कलाकार एकमेकाशी संपर्कहीन झाले होते. वडीलधारी कार्यकर्ते आणि आधारस्तंभही आशीर्वाद देऊन गप्प बसले होते. प्रमुख कार्यकर्ते लग्न करून संसाराला लागले होते. सगळीच फाटाफूट. दुष्मनांनी संधी साधली. पुनर्विकासात “प्रयोग मालाड”चे कार्यालय दुष्मनांनी गिळंकृत केले. तेव्हाच काही कार्यकर्त्यांना जाग आली. अनेक खटपटीनंतर बिल्डरने स्वतंत्र कार्यालय “प्रयोग मालाड”ला दिले. पण मालकीहक्काबद्दल कटकट होतीच. अशीच काही वर्षे गेली.

एक दिवस कोणाच्या तरी मनात “प्रयोग मालाड”च्या पुनर्जीवनाचे विचार आले. एकत्र येण्यासाठी सर्वांनी सहलीला जायचे ठरवले. दोन दिवस एकत्र मजा केली आणि ठरवले पुन्हा “प्रयोग मालाड” सुरु झाले पाहिजे. “प्रयोग मालाड”ची सुरुवात नाटकापासून झाली. पुनर्जीवनही नाटकापासूनच. श्रीकांतने जबाबदारी घेतली. आणि पुनर्जीवनानंतरचा पहिला प्रयोग अनिल बर्वे लिखित “आकाश पेलताना” या नाटकाने झाला. प्रयोग सुंदरच झाला. कलाकारांना उद्देशून मी केलेले कौतुक आणि आवाहन.

आकाश पेलताना सारेच झटले
प्रेक्षकांच्या मनात रोमांच उठले

प्रत्येकजण वेडा झाला होता
आकाश पेलायला उत्सुक होता

प्रत्येक भुमिका मस्त वठली
प्रयोगाची भूमिती मनात साठली

आकाश पेलताना सारेच झाले धुंद
उधळले अभिनयाचे रंग झाले बेधुंद

तालमीची आठवण साचलीय मनात
म्युझिकचे सूर घोळतायत कानात

लवकरच येऊ दे पुढचे प्राॅडक्शन
उतावीळ झालय मन करायाला अॅक्शन

************

प्रयोगच्या पंखांवर
होऊन स्वार
स्पर्धांच्या आकाशात
करा मुक्त विहार

प्रबळ इच्छा
हेच पंखांच बळ
प्रयोगच्या साथीने
पंख होतील सबळ

घेऊन भरारी उंच
गाजवा प्रत्येक मंच
तुमचा पूर्ण संच
आता प्रयोगचा प्रपंच

तुमच्या प्रत्येक भरारीला
प्रयोगच्या शुभेच्छा

In