प्रदीप राणे लिखित ‘अनजान शहर’ – दोन अंकी नाटक – प्रयोग मालाड च्या आग्रहामुळे बऱ्याच वर्षांनी प्रदीप राणेंनी मराठी रंगभूमीसाठी नाटक लिहिले. प्रयोग मालाड निर्मित या नाटकात कवी ग्रेस यांच्या ‘पाऊस’ ह्या कवितेचा उल्लेख होता. या नाटकाच्या सादरीकरणात कवितेचा उपयोग करण्यासाठी कवींच्या वारसांची संमती न मिळाल्यामुळे सदर नाटक कवितेशिवाय सादर केले गेले. मी मात्र त्या कवितेसारखीच परंतु त्या कवितेपेक्षा पूर्णपणे वेगळी कविता लिहून मोकळा झालो. पण ही कविता नाटकाच्या सादरीकरणात घेतली गेली नाही.
पाऊस …
जीवनातला,
पाघोळ्यांसारखा.
पाघोळ्या …
कधी धो धो वाहणार्या,
कधी रिमझिमणार्या.
पाऊस …
वेड्यावाकड्या रस्त्यासारखा,
कधी मुसळधार,
तुफानाबरोबर खेळणारा,
डोंगरकड्यावरुन कोसळणारा.
तर कधी …
अंगणातल्या मातीला
सुगंधीत करणारा.
पाऊस …
गावाकडल्या मातीत रुजणारा,
शहरी डांबरी रस्त्यावर वाहणारा.
पाऊस …
माझा,
तुझा,
सर्वांचाच.
पाऊस …
… प्रदीप देवरुखकर
Leave a Reply