सलोनी सावंत … प्रयोग मध्ये येऊन अचानक लुप्त झालेली नाट्यकर्मी …

‘बोली भाषा’ एकांकिका स्पर्धेत “पाझर”, “ड्रायव्हर” आणि “झो केल्याने” या एकांकिका अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक पटकावून गेल्या. मालवणी एकांकिका सादर केल्यानंतर जाहीर झालेला निकाल ऐकल्यावर निराश झालेल्या सलोनीचे हे सांत्वन …

ससा रे ससा

ससा रे ससा
असा तु कसा
शर्यत हरलास म्हणुन
का झालास ईवलासा?

अरे…..
“ड्रायव्हर” होताच छान
“झो केल्यानं … सैराटलेला”
प्रत्येक गीअर मस्त होता
सर्वाथाने नटलेला

झ-या सारखा “पाझर”ला
मराठवाड्याचा “पाटेकर”
तृप्त मनाने देऊन ढेकर
फर्स्ट प्राईज गया लेकर

“बोली भाषा” सर्वांना होती आशा
पण….
गुडाळावा लागला गाषा
कारण …….
तो होता “स्पर्धेचा” तमाशा

होताच तो तमाशा
मग का ही निराशा?
लाव स्वत:शीच “बोली”
पल्लवित कर आशा

करशील ना सशा?

In