नसतेस तू घरी जेव्हा… ?

Smita Deorukhkar and Pradip Deorukhkar

आज “ति” चा वाढदिवस. हे फक्त तिच्यासाठीच!

नसतेस तू घरी जेव्हा…?

नसतेसच तू घरी, ट्वेल इन टु सिक्स
कारण रोजच तुझा, प्रोग्रॅम असतो फिक्स

नोकरीसाठी जातेस, रोजच दूर दूर
परत येईपर्यंत, मनी मात्र हूर हूर

रोज पोहोचतेस घरी, एकदम दिवे लागणीला
उशीर होतो तेव्हा, जीव लागतो टांगणीला

जन्माने आहेस तू, माथेरानची राणी
काय केलस कुणास ठाऊक? झालीस माझी सम्राद्मी

कॉलेजमधे होतो तेव्हाच ठरवलं होत की बायकोच नाव स्मिता ठेवायचं.
स्मिता होऊन तू घरी आलीस आणि जाणवलं…

स्मिता
तुझ्या स्मिताने
झालोय स्तिमित
मी गोल्डस्मिथ

खरं तर तुझा पेशा परिचारीकेचा. तुझ्या पेशाचा धर्म तु आपल्या संसारातही सांभाळलास. तसा माझ्या कुटुंबाचा आकार खुप मोठा. कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेताना तुझ्यातल्या परिचारीकेला न विसरता होम मिनिस्टरची जागा कधी घेतलीस ते कळलही नाही. माथेरानची राणी डोंगरदर्‍यातील वळणावळणाच्या प्रवासात आपल्या प्रवाशांना सुखरुप मुक्कामी पोहोचवते. जन्मजात माथेरानची राणी असल्यामुळे ३२ वर्षाच्या आपल्या सहजीवनातील प्रत्येक वळणावर यथोचित झेंडा दाखवून गार्डची भुमिका समर्थपणे निभावलीस.

नसतेस तू घरी जेव्हा…? असा कधी मी विचारच करीत नाही.

तु कधी नसलीस तरी नेहमीच असतेस… माझ्यात.

कारण…

तूच माझी जीवनसरीता

तुझ्या शिवाय मी रिता

— प्रदीपदेवरुखकर

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *