सतीसावित्री …

बने काका-काकी – मधुर सोसायटीचे मूळ सभासद नसले तरी सर्वांशी आपुलकीने बोलणारे.  सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे.  मधुरच्या पेन्शनर्स कट्ट्यावर रोज संध्याकाळी काकांची उपस्थिती सवयीची झाली होती. नुकतेच काकांचे महानिर्वाण झाले.  काकांशिवाय  काकी  क्वचितच दिसायच्या.  काकांच्या मागून हळुवारपणे सावलीसारख्या चालत जाणाऱ्या काकी न बोलता खूप काही सांगून जायच्या.  जीवनाचा निरोप घेतानाही त्यांनी तेच  केलं.  अशाच हळुवारपणे काकांच्या सावलीत मिसळून गेल्या. … काकांच्या मागे लगेचच.  कायमच्या. दोघांनाही श्रद्धांजली. 

संथ चालीने फिरे द्वयी
मधुरच्या रस्त्यावरी
दिवस काय उगवला
सावित्री गेली देवाघरी

सावित्रीने जणू पाठ राखली
पतीमागे गेली यमसदनी
हजर झाली पतीसेवेला
पतिव्रता ती हास्यवदनी

जीवनभराची सुंदर साथ
अढळ विश्वास पतीवरी
तिथेही देईल त्याची साथ
आली संकटे असंख्य जरी

…. दोघांनाही श्रद्धांजली

…. प्रदीप देवरुखकर 

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *