सुप्रिया – अश्विनी क्लिनिक मधील माझी सहकारी. ज्युनिअर असली तरी आमची थट्टामस्करी चालायची. हळवी पण कामात चोख. कर्तव्यदक्ष. चांगली संधी मिळाली आणि तिने नोकरी सोडली. नव्या नोकरीतील नव्या क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी दूर गेली पण फेसबुकवर नेहमीच भेटत राहिली. फेसबुकवर प्रकाशित झालेल्या तिच्या अनेक फोटोवरुन तिला पर्यटनाची आवड असल्याचं कळलं. फेसबुकवर प्रकाशित झालेल्या तिच्या अनेक फोटोमधील ‘हा’ एक फोटो आणि त्यावरील माझ्या काही ओळी …
पांढऱ्या शुभ्र कापसावर
बसलंय एक अस्वल
निळीशार पांघरून झुल
चटकन कोणालाही फसवंल
फस्त करतंय मस्त खाऊ
घेऊन हाती कापुसमेवा
मनालीची टूर म्हणजे
आयुष्याचा आठवण ठेवा
Leave a Reply