९ मे २०२१, दुपारी पावणे दोनला उन्मेषचा संदेश आला. रत्नाकर वर्दे यांचे निधन झाल्याचे त्याने कळविले होते. ११ एप्रिलला संदीप भागवतचे निधन झाले होते. दोघेही कोरोनाचे बळी ठरले. शालेय मित्र एकनाथ राणेही कोरोनानेच गेला. ओळखीतले बरेच जण कोरोनामुळे हे जग सोडून गेले होते. सभोवताली घडणारे मृत्यूचे तांडव पाहून नैराश्य वाढत होते. त्या नैराश्येतच उन्मेषला लिहून पाठवले…
क्षणभंगुर आहे सारे
अनिश्चिततेचे सर्वत्र वारे
घडते हे सर्व का रे?
विचारू कुणाला?
आज एक गेला
दुसरा-तिसराही संपला
काळाचा हा घाला
डंखतो मनाला
मन कावरेबावरे
भांबवले बिचारे
आज मी आहे
उद्याचे काय रे?
उद्या …
पुरून उरेन काळाला
लागणार नाही गळाला
पाहुन आवेश माझा
काळ दूर पळाला
Leave a Reply