सर्वांसाठी मास्क बनवायला
हवाय मला
एक आईचा पदर
लहानपणी…
मुसळधार पावसात सुद्धा
कोरडेपणाचा फील यायचा
कारण डोक्यावर होता
आईचा पदर
तडाख्याच्या उन्हात सुद्धा
शीतल छाया मिळायची
कारण डोक्यावर होता
आईचा पदर
मेकअप न करताही
चेहेरा उजळून निघायचा
कारण तोंडावर फिरायचा
आईचा पदर
आज…
नको ते हॉस्पिटल
नको आय सी यु
सुरक्षित झोपेसाठी हवाय
आईचा पदर
नको डॉक्टर
नको वैद्य
तंदुरुस्तीची औषधे
आईच्या पदरातील
नको ऑक्सिजन
नको रेमडेसिविर
जीवनरस देणार
आईचा पदर
कोरोनाशी झुंजायला
मास्कच्या ऐवजी
हवाय मला एक
आईचा पदर
— प्रदीप देवरुखकर
Leave a Reply