उल्का … अलका सैतवडेकर

७ ऑक्टोबर … “ती” चा वाढदिवस …

उल्केसारखीच अचानक टपकली प्रयोगच्या प्रांगणात आणि प्रयोगचीच झाली.  प्रत्येक प्रयोगात अधिकाधिक उजळत गेली.  आणि परत अचानक उडून गेली.

ती………

सतत असते सतावत
मेसेज सारखे पाठवत
on the way
just started
still at airport
आम्ही बसतो वाचत
खिन्न मनाने…

“दर्दभरी” आवाजाने
पेश होते दिमाखाने
“वंश” फुलवताना
जिंकुन जाते सहस्र मने
सहजतेने…

लेनाला मिळाली
नागपुरला चमकली
नकळत जुळली
नाळ प्रयोगशी
सर्वार्थाने…

प्रयोगच्या रंगमंचावर पडलेल्या या उल्केला
आयुष्यातल्या प्रत्येक जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा
सर्वांच्या वतीने…

….. आता भाग २ (लग्नानंतरची अलका)

मेसेज आता बंद झाले
सतावणे सुद्धा थंड झाले
मेसेज वाचणारे खिन्न मन
आता बरेच सावरले.

‘दर्द’ आवाज सर्द झालाय
दिमाख सुद्धा तर्र झालाय
वंशाच्या आठवणीने
मन सुद्धा प्रसन्न झालंय

प्रयोगच्या या उल्केची
गोमांतकात जुळली नाळ
रंगकर्मींच्या गृपवरील
‘पोष्टी’ तिच्या मधूर रसाळ

… … दरवर्षी प्रमाणे जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा
सर्वांच्या वतीने…….

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *