रश्मी – लाला लजपत राय कॉलेजमधील एक सहकारी. कामात तत्पर, तसेच मदत करण्यासही सर्वात पुढे. वयाने लहान. ‘सर’ म्हणत आदर करणारी.
एक दिवस बातमी आली. वर्ष आठवत नाही. पण २९ फेब्रुवारीचा दिवस होता तो. रश्मीने नोकरीचा राजीनामा दिला होता. आश्चर्य वाटले नाही. कारण उज्ज्वल भवितव्य आणि आकर्षक व तोलामोलाचा मेहनताना मिळणे, हेच सर्वांचे ध्येय असते. प्रथेप्रमाणे निरोप समारंभचा क्षण आला. तिला दिलेल्या निरोपाच्या या शुभेच्छा…
आणि नंतर चमत्कार घडला …
नवी नोकरी सोडून काही दिवसातच रश्मी, परत लाला लजपत राय कॉलेजच्या नोकरीत रुजू झाली …
जुन्याच नोकरीत परत रुजू होणाऱ्या रश्मीला, नव्या आयुष्यातील नव्या नोकरीसाठी शुभेच्छा देणं क्रमपात्रच होतं.
आपोआपच शब्दातून शुभेच्छांचा फुलोरा फुलला …
औरंगजेब पळाला
महाराज आग्र्याला सुखरूप परतले, नव्या कामगिरीवर ….
…………. ‘लाला’ मधील चमत्कार
Leave a Reply