स्नेहाचा स्नेहबंध …

१२ जुलै २०१६… उदुने आयुष्याची साठ वर्षे पूर्ण केली.  सगेसोयरे, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि इतर शुभेच्छुक सर्वांना त्याने खंडाळ्याला पार्टी दिली.  बर्थ डे पार्टीला सर्वांनी फुल टू धम्माल केली.  उदू-स्नेहाची जोडी पाहुण्यांची सरबराई करण्यात बिझी होते.  उदुच्या दोन्ही मुली आपल्या बाबाच्या साठाव्या बर्थ डे च्या पार्टीची तयारी करण्यात गुंग होत्या.  सहज मनात विचार आला की स्नेहाच्या मनात आत्ता काय विचार असतील ?  आणि ते विचार सरसर मोबाईलच्या कागदावर (Notepad मध्ये) उतरले  …

जीवन माझे मनोहारी
मनोहर माझा लय भारी

आहे तो भलताच करारी
पण डोळे वटारताच पाय धरी

प्रेमही तेवढेच करी
पण प्रेमात मात्र मीच खरी

म्हणुनच मी त्याची प्यारी
पण त्याच्या प्रेमाची रीतच न्यारी

दोन कन्यांचा बाप जरी
संसारात मात्र अव्यवहारी

साठी गाठलीय त्यानी जरी
वाढलीय मात्र माझीच जबाबदारी

घरात नात आलीय तरी
अक्कल आजोबांची आहेच दुरी

नाती समोर हा नेहमीच हारी
पण जगाला हा एकटा भारी

म्हणुनच म्हणते…….

मनोहर माझा लय भारी
त्याच्यापुढे शुल्लक दुनिया सारी

………… स्नेहा

In