निरोप घेताना त्यादिवशी
जुळवलेस ओठ माझ्या हाताशी
अत्तरच लावलेस जणू आठवणींचे
प्रितीने भरलेले तुझ्या मनीचे
तयाचा सुवास हाच तुझा सहवास
आजही दरवळतोय माझ्या मनी
म्हणूनच या कोटी कोटी शूभेच्छा
गोड गोड बोलण्याच्या गोड दिनी
…………….. तुझा निरोप घेतल्याला वर्षे लोटली. निरोप घेतानासुद्धा भांडत भांडत गोडच बोललीस. म्हणूनच या शूभेच्छा. आठवणीनं पाठवलेल्या…………
…………… प्रदीप देवरुखकर
Leave a Reply